चार्ल्स डार्विन (१२.२.१८०९-१९.४.१८८२) ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञाच्या उत्क्रांतिवादावरील सिद्धांताने जगातील विविध विषयांवर मूलभूत प्रभाव पाडला आहे. अनेक पारंपरिक कल्पनांना त्याने धक्के दिले आहेत. डार्विनचा हा संशोधन प्रवास इतका सहज नव्हता. धार्मिक पगडा असलेल्या मूलतत्त्ववाद्यांपासून अनेक समकालीन वैज्ञानिकांनी त्याला विरोध केला, डार्विनचे संशोधन ह्या सर्व अग्निदिव्यातून कसोटीला उतरले.
डार्विन कोण आहे? त्याचा सिद्धांत काय आहे? त्याला कोणकोणत्या विरोधाला सामोरं जावं लागलं. पुढे हा सिद्धांत कसा सर्वमान्य झाला यासंबंधीची चर्चा ह्या पुस्तकात लेखकाने केली आहे. केवळ विज्ञानाच्या अभ्यासकांना नव्हे; तर एकूण जीवसृष्टीबद्दल कुतूहल असणार्या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरेल. आज आपण डार्विनच्या जन्माची द्विशताब्दी साजरी करत आहोत. ह्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकाचे वेगळेच मोल आहे.