प्रमाण भाषेला दर्जा व गुणवत्ता प्राप्त होते ती शुद्धलेखनामुळे. भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर शुद्धलेखन यायलाच हवे. शुद्धलेखनाची सवय विद्यार्थी जीवनात विकसित केली तर पुढील शैक्षणिक आयुष्यात भाषेच्या अभ्यासात अडचणी जाणवत नाहीत. विद्यार्थ्यांनी शुद्धलेखनाचा सराव कसा करावा याबाबत या पुस्तकात सुलभ मार्गदर्शन मिळते. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व भाषेच्या अभ्यासकांनी संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक.