आता मी तिच्याकडे नीट निरखून पाहिले. दिसायलाही ती अगदी सुंदर नसली, तरी आकर्षक होती. माझा बिझिनेस हा मुळात फॅमिली बिझिनेस आहे. हे कळल्यामुळे ती जास्तच खुलून बोलत होती. कोण होती ती ? हा ‘मी’ कोण ? कसला बिझिनेस ? `‘सर, आमच्या साहेबांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. मी याला सांगत होते, की हे सर्वांना कळव, पण त्यानं ऐकलं नाही.’' `‘कसा मृत्यू झाला? का तुम्ही दोघांनी त्यांचा खून केलात?’' उत्तमसिंग घाबरून म्हणाला, ‘`नाही, सर. आम्ही काही केलं नाही. त्यांचं हार्ट बंद पडलं.’' `‘किती दिवस झाले?’' `‘सर, साधारण एक आठवडा झाला असावा.’' कोण हे साहेब ? त्यांचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू ? खून असेल, तर कशासाठी ? ‘‘काय करायचं आहे?’' `‘एकाचा गेम वाजवायचा आहे. जमेल ना?’' ‘`कोण माणूस आणि कुठे आहे, त्यावर अवलंबून आहे.’' `‘एकटाच माणूस आहे. अंडरवर्ल्डमधील नाही. गोव्यात आहे.’' `‘काही खास कारण? जुनी दुष्मनी?’' `‘तू कारणाचा विचार करू नकोस, कामाचा विचार कर.’' कोणाचा गेम ? कोण करणार ? कशासाठी ? डोक्याला मुंग्या आणणारं रहस्य आणि त्याची तितकीच चित्तथरारक उकल. दोन तुल्यबळ बुद्धिबळपटूंमधील इरेसरीचा डाव वाटतील, अशा तीन रहस्यकथांचा संग्रह !