रेखा काखंडकी या कर्नाटकातील आघाडीच्या लेखिका आहेत. यांनी स्वत: पाहिलेले सामाजिक व कौटुंबिक जीवन कादंबर्यांमध्ये सरळ व आकर्षकपणे चित्रित केले आहे. उत्तर कर्नाटकातील बोलीभाषेच्या वापराने त्यांच्या कादंबर्यांना प्रादेशिक बाज आलेला आहे. त्यांनी पंचवीसहून अधिक कादंबर्या लिहिल्या आहेत. त्यांच्या काही कादंबर्यांवर चित्रपट व दूरदर्शन मालिका निघाल्या आहेत. प्रस्तुत कादंबरी ‘ब्रह्मांड’ ही ‘मयूर’या कन्नड नियतकालिकात प्रथम प्रसिद्ध झाली, तेव्हा असंख्य वाचकांना आवडली होती. नंतर ती पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. या कादंबरीत लेखिकेने मानवीय संबंध, जीवनाचे मौल्य यांचा शोध घेता घेता मनाच्या
गाभार्यातील पदरही उलगडून दाखवला आहे. सदू या व्यक्तीच्या द्वारे स्वत:च्याच मनाचा शोध घेत आत्मपरीक्षण करणार्या नानी मास्तरांना‘सत्य नेहमी ब्रह्मांडच असते... त्यापुढे खोटे हे कृमिकीटकासारखे क्षुल्लक असते’ असा शोध लागतो हे कादंबरीचे कथानक आहे. हा अनुवाद मराठी वाचकांना आवडेल अशी आशा आहे.