माहितीच्या विस्फोटात विशेषतः सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत वाचनसंस्कृती नष्ट होते आहे काय, असा प्रश्न गेल्या दशकापासून विचारला जाऊ लागला आहे. याचे कारण संगणक आणि स्मार्टफोनसारख्या साधनांमुळे दीर्घवाचनाची मेंदूची क्षमता कमी होते आहे, असे तज्ज्ञ मानू लागले आहेत. एकीकडे वाचनसंस्कृतीची चिंता व्यक्त केली जात असतानाच चांगल्या पुस्तकांना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक राहिला आहे. अर्थात कोणत्या लेखकाचे कोणते पुस्तक उपलब्ध झाले आहे, त्याची किंमत काय आणि त्यात नेमके काय आहे, याचे दिशादर्शन झाले तर त्या पुस्तकाची व वाचकाची भेट होण्याची शक्यता वाढते आणि हा व्यवहार वाचनसंस्कृतीला पुढे नेणारा ठरतो. असा हा व्यवहार पुढे नेण्याचे कार्य अभिलाष खांडेकर यांनी सातत्याने केले आणि त्यातून हे अतिशय उपयुक्त असे पुस्तक साकारले आहे