दोन हजार वर्षांपूर्वी पंचतंत्रातल्या प्राणीकथांनी बालकथांची सुरूवात झालेली आहे. आजच्या बालकथेत फार मोठा भाग या प्राणीकथांनी व्यापलेला आहे.पंचतंत्रासोबत पुढे इसापनीतीच्या कथांनीही बालसाहित्याचे दालन समृद्ध केलं आहे.या बोधकथेतील पात्रे बरेचदा पक्षी, प्राणी अन् झाडंही असतात. ती माणसांसारखं बोलतात. कृती करतात. या कथांतून माणसाने कष्ट करावे, प्रामाणिकपणे वागावे, दुसर्यास मदत करावी, प्रामाणिकपणे वागावे, दुसर्यास मदत करावी, दुसर्याचे वाईट करू नये – यासारख्या गोष्टी सोप्या घटनांतून सांगितल्या आहेत.गोष्ट जेव्हा संपते, तेव्हा त्यातून मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरेल असा बोध अथवा संदेश दिलेला असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या बोधकथांचे वाचन उत्तम संस्काराचे काम करू शकते.छोटी छोटी वाक्ये, ठळक अक्षरं आणि प्रसंगानुरूप चित्रांमुळे बालमंडळींना ते खास आवडेल.