खोटे ठरविले आहे. समाज व राजकारण यावर आपला ठसा सोडण्याचे त्यांचे कार्य मात्र अजूनही संपलेले नाही.येथे प्रथमच लालू यादव यांची चित्तवेधक कथा सांगण्यात आली आहे. आपली दुर्दशा निमूटपणे सोसणाऱ्या एका राज्याचे नेतृत्व त्यांनी कसे केले याचीही ही कथा आहे. ती संकर्षण ठाकूर यांच्यासारख्या पत्रकाराच्या बारीक नजरेतून अत्यंत वेधकरीत्या सांगण्यात आली आहे. ती ना बदकथा आहे, ना संतचरित्र. ती आहे, त्यांच्या धाटणीचे राजकारण व अनेकांगी लोकानुरंजन लोकांसाठी काय करते याची एक साधी सरळ गोष्ट:संकर्षण ठाकूर – १९६२ साली पाटण्यात जन्मले असून १९८४ पासून ते पत्रकारितेत आहेत. इंडियन एक्स्प्रेस, तहलका येथे त्यांनी पत्रकारिता केली. ते दिल्लीत राहतात.जयदेव डोळे – १९५७ साली पुण्यात जन्मले. १९७८ पासून त्यांनी पत्रकारिता सुरू केली. साधना, श्रमिक विचार, मनोहर, मराठवाडा येथे ते होते. सध्या औरंगाबादेत पत्रकारितेचे प्राध्यापक.