उत्पादन माहितीवर जा
1 च्या 2

भटकंती (भटकंती) डॉ. पी.एल. गावडे यांचे

Description

पुढील 'माझ्या जीवाची आवडी. पंढरपुरा नेईन गुढी' या माउलींच्या आवडीप्रमाण अनेक वर्ष मी आळंदी-पंढरपुराच्या वारीत वाटचाल करत राहिलो. 'टाळी वाजवची, गुढी उभारावी बाट। ती चालवी पंढरीची' या संत चोखोबांचा अभंगाचा आनंद या वाटचालीत होता. पंढरीची अन् पंढरीनाथ भेटीची पंढरी किती उत्कट असते ते पहायचं असेल, तर या सोहोळ्याच्या वाटचालीत सहभागी व्हावे. सुमारे पंढरा, अठरा दिवसांच्या वाटचालीत हरिनाम गजराशिवाय अन्य विषय नसतो. मृदुंग, अभंगगायन हरिनामाचे उच्चारण याशिवाय अन्‍य ध्वनी नसतो. 'पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे।' असा आध्यात्मिक आनंद प्रत्येकाचा मनी दाट असतो. 'वारकरी सांप्रदायिक भजनी मालिकेने' लावलेली शिस्त या अभंग गायनात असते. प्रत्येक वाराचे-दिवसाचे अभंग ठरलेले असतात. संध्याकाळची समाज-आरती, पूर्वरात्री कीर्तन अन् उत्तररात्रीचा जागर प्रत्येक मुक्कामाचे तळे नामस्मरणाने सतत निनादत असतात. 'दोन्ही टिपरी एकचिद. सगुण निगरण नाही भेद रे' असा तत्वज्ञानाचा गोफ गुंफतवारी पंढरपुरात आढळते. मनाला आध्यात्मिक आनंदाचा विसावारी ही भावपूर्ण भटकंती मला फार भावली.
नियमित किंमत
Rs. 150.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 150.00
-0%
Bhatkanti भटकंती By Dr P L Gawade
भटकंती (भटकंती) डॉ. पी.एल. गावडे यांचे

Rs. 150.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल