विज्ञान जगतात घडणाऱ्या घटनांविषयी सर्वांनाच कुतूहल असते. त्यात वैज्ञानिकांच्या जीवनाविषयी जाणून घेणे तर पर्वणीच ठरते. सामान्य वाटणाऱ्या या व्यक्ती असामान्य ध्येयाने प्रेरित असतात. विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत संशोधन करताना शास्त्रज्ञ धर्म, देश, भाषा, स्थळ, काळ यांची बंधने विसरून असेच अज्ञानाचा शोध आणि मानवी कल्याणाचे सूत्र डोळ्यासमोर ठेवून ते अखंडपणे प्रयोग आणि अभ्यास करतात. स्वाभिमान, साधेपणा, आत्मविश्वास, चिकाटी, कामात झोकून देण्याची तयारी, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मार्ग काढण्याची वृत्ती असे अनेक गुण शास्त्रज्ञांमध्ये असतात. त्यांच्याविषयी वाचून आपल्याला प्रेरणा तर मिळतचे शिवाय काहीतरी करून दाखवायची जिद्दही निर्माण होते. ‘भारतीय शास्त्रज्ञ’या पुस्तकातून डॉ. विक्रम साराभाई, बिरबल साहनी, सलीम अली, होमी भाभा, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, शांतिस्वरूप भटनागर, जयंत विष्णू नारळीकर, श्रीनिवास रामानुजन या शास्त्रज्ञांची माहिती मिळते. त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्से मनोरंजन करण्याबरोबरच खूप काही शिकवून जातील. यांसारख्याच शास्त्रज्ञांच्या काही रंजक माहितीची पर्वणी वाचकांना प्रस्तुत पुस्तकातून मिळेल.