'गरिबी हटाव'ची घोषणा करत वर आलेल्या इंदिरा गांधी यांनी पुढे त्यासाठी वीस कलमी कार्यक्रम रामवला. परंतु देशातली गिरिबी किती कमी झाली? हा प्रश्न शिख होताच. मात्र या घोषणेचा आणि त्यानंतरच्या बीस कलमी कार्यक्रमाचा परिणाम म्हणून भारतातील ऐरणीवर आला. सातत्याने चर्चेत राहिला. ही चर्चा जागतिकीकरणाच्या प्रभावानंतर यांबली होती. २००८ मध्ये आलेली जागतिक मंदी, त्यात शेअर बाजाराची झालेली पडझड यातून भारत सुटला होता. पण आता पुन्हा आलेली तीव्र स्वरुपाची मंदी, त्यात सुरू असलेली तीव्र भाववाद, कोरोनाच्या प्रभावातून वाढत जाणारी बेरोजगारी यातून आता भारताला सुटायचे आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रा. वि. म. दांडेकर आणि प्रा. नीलकंठ रथ यांनी पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'Poverty in 'India' या निबंधाला विशेष महत्त्व प्राप्त होते. गरिबीचा प्रश्न नेमकेपणाने समजून घेण्यासाठी, ती हटवण्यासाठी, रोजगार वाढवण्यासाठी कोणते उपाय कसे अंमलात आणता येतील याची दिशा दाखवणारा हा निबंध पुस्तक रूपाने वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. हा पुनर्प्रकाशनाचा प्रयत्न अर्थतज्या धोरणकर्ते आणि सामान्य माणूस यांना गरिबीविषयी नवान विचार करायला नक्कीच प्रेरित करेला.
नंदा खरे