भारतरत्न हा भारत सरकारतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या व्यक्तीने कुठल्याही क्षेत्रात प्रदान केलेली असाधारण सेवा किंवा कर्तृत्व आणि मानवी आयुष्य उज्ज्वल करण्यासाठीचे त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला जातो.
हे पुस्तक म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रातील अशा तीन भारतरत्नांची साद्यंत ओळख आहे.
“स्पर्धा ही राष्ट्राच्या आर्थिक समृद्धीची ताकद असते. ज्ञानाच्या सामर्थ्याने स्पर्धा निर्माण होते आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व संशोधनामुळे ज्ञान निर्माण होते.”– डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
“आपली अपयशी वृत्ती सोडा, विजयाचा ध्यास धरा. सत्तेच्या मोहाचा त्याग करा. ‘विज्ञान… आणखी विज्ञान, संशोधन… आणखी दर्जेदार संशोधन’ हा मंत्र जपा.”– सर सी. व्ही. रमन
“विज्ञानाची शिडी अध्यात्माच्या शिडीसारखी उंच उंच जाणारी असते. तिची लांबी अनंत आहे, तिच्यापुढे आपण क्षुल्लक आहोत ही जाणीव ठेवल्यानेच अपेक्षित नम्रता आपल्या ठाई येईल.”– डॉ. सी. एन. आर. राव