या पुस्तकात एकविसाव्या शतकातील एक्केचाळीस आदर्श व्यक्तींची चरित्रात्मक माहिती देऊन त्यांच्या जीवनकार्याचा व सिद्धींचा ऊहापोह केला आहे.सर्वसाधारपणे या महान व्यक्तींची जीवनविषयक विचारसरणी अशी होती की, त्यामुळे जगातील अपप्रवृत्तींचा नाश व्हावा आणि सामंजस्यांचे, सद्भावाचे, विश्वासाचे व सहाकार्याचे वातावरण नांदावे.या महान व्यक्ती प्रभावशाली असून त्या सार्वजनिक जीवनाच्या अनेकविध क्षेत्रांत श्रेष्ठत्व पावलेल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या परिस्थितीप्रमाणे, आवडीप्रमाणे कार्यक्षेत्र निवडून त्यात अप्रतिम कामगिरी बजावली आहे.राजकारण, समाजकारण, समाजकारण, धर्म, विज्ञान, शिक्षण, तत्त्वज्ञान अशा बहुविध क्षेत्रात असाधारण कार्य करून त्यांनी समाजाच्या, देशाच्या प्रगतीत अपूर्व योगदान दिले आहे.या त्यांच्या कार्यामुळे भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान त्यांना राष्ट्राकडून समर्पित केला गेला आहे. 2014 ते 2015 च्या दरम्यान भारतरत्न मिळालेल्या चार श्रेष्ठ व्यक्तींचा या आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे. चालू वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी व इतर विविध क्षेत्रांत प्रगती साधण्यासाठी कोणी काय कष्ट उपसले, प्रयत्न केले याची कल्पना या पुस्तकावरून येईल व या महान व्यक्तींची जीवन चरित्रें लोकांना उद्बोधक व प्रेरणादायी ठरतील, अशी आशा आहे.