भगीरथाने प्रयत्नाने पृथ्वीतलावर गंगा आणल्याची पुराणकथा सर्वज्ञात आहे. आजच्या आधुनिक जगात आपल्या कल्पनेने, परिश्रमाने उजाड माळावर गंगा आणून तिथे नंदनवन करणार्या भगीरथाची ही कथा आहे.
आजच्या काळातील असा ‘भगीरथ’ कौतुकास व अभिमानास पात्र आहे. त्याची ही कथा चैतन्यदायी तर आहेच; पण एका प्रयोगशील वृत्तीच्या माणसाची यशोगाथा आहे. हा नवा भगीरथ ह्या पुस्तकात आपणास भेटत आहे. वाचकांना त्याच्या भेटीचा आनंद मिळेलच, यात शंका नाही.