उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Belonging By Sameem Ali, With Humphrey Price, Sindhu Joshi

Description

बालपणीच आईवडिलांनी टाकलेली समीम अनाथालयात सात वर्षांची होई पर्यंत राहिली. अचानक एके दिवशी तिच्या कुटुंबियांनी तिला परत नेण्याचे ठरविले; तेव्हा तिला कधी एकदा स्वत:च्या घरात जाईन असं झालं. ती आली मात्र एका अत्यंत घाणेरड्या घरात; जिथं तिला तिच्या लहान वयाला न झेपणारी कामे सतत करावी लागत. तिच्या जन्मदात्रीनेच तिचा अनन्वीत छळ आरंभला. या सर्वाला आपण स्वत:च जबाबदार आहोत असे लहानगी समीम समजू लागली. स्वत:च स्वत:ला शारीरिक इजा करून घेऊ लागली. आईबरोबर पाकिस्तानात जायला मिळणार हे समजल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. तेथे पोहोचल्यावर मात्र तिला कळून चुकले की तिच्या आईने तिला सुट्टीवर नेलं नव्हते. तेरा वर्षाच्या समीमचे एका अनोळखी पुरुषाबरोबर बळजबरीने लग्न लावण्यात आले. दिवस गेल्यावर तिला परत ग्लासगोत आणण्यात आले; ते केवळ कुटुंबाकडून होणारा छळ सोसण्यासाठी. खरं प्रेम म्हणजे काय याची जाणिव झाल्यावर स्वत:च्या लहान मुलाला घेऊन तिने घरच्या हिंसाचारापासून स्वत:ची सुटका करून घेतली. स्वत:च्या घरचा भयानक अनुभव ती मागे ठेऊन आली असा तिला विश्वास होता. परंतु तिच्या पळून जाण्याने तिच्या कुटुंबाच्या झालेल्या बेइज्जतीच्या परिणामांना तिला तोंड द्यावे लागेल याची कल्पना तिला कशी असणार? बिलाँगिंग म्हणजे एक धक्कादायक सत्य घटना आहे. ही कथा आहे एका छोट्या मुलीची, स्वत:च्या भूतकाळापासून करून घेतलेल्या सुटकेची, मोठी होत असतांना स्वत:च्या कुटुंबाकडूनच होणा-या छळा विरूद्ध दिलेल्या लढ्याची. सध्या नवरा आणि स्वत:च्या दोन मुलांबरोबर समीम अली मँचेस्टरला राहते. स्थानिक राजकारणात तिचा सक्रीय सहभाग आहे. मॉस साईड या संस्थेत ती समुपदेशनाचे काम करते. बळजबरीने लावल्या गेलेल्या लग्नांविरूद्ध ती सतत आवाज उठवत आहे. Abandoned by her parents, Sameem Ali spent six and a half years growing up in a children`s home. When she was told that her family wanted to take her back she couldn`t wait to start her new life with them. Instead, she returned to a dirty house where she was subjected to endless chores. Her mother began to beat her and her unhappiness drove her to self-harm. So Sameem was excited when she boarded a plane with her mother to visit Pakistan for the first time. It was only after they arrived in her family`s village that she realised she wasn`t there on holiday. Aged just thirteen, Sameem was forced to marry a complete stranger. When pregnant, two months later, she was made to return to Glasgow where she suffered further abuse from her family. After finding true love, Sameem fled the violence at home and escaped to Manchester with her young son. She believed she had put her horrific experiences behind her, but was unprepared for the consequences of violating her family`s honour ...Belonging is the shocking true story of Sameem`s struggle to break free from her past and fight back against her upbringing.
नियमित किंमत
Rs. 300.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 300.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Belonging By Sameem Ali, With Humphrey Price, Sindhu Joshi
Belonging By Sameem Ali, With Humphrey Price, Sindhu Joshi

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल