उत्पादन माहितीवर जा
-
मीडिया गॅलरी मीडिया गॅलरी
Being Mortal By Dr.Atul Gawande
Description
Description
"अलीकडे वाढत चाललेल्या सरासरी आयुर्मानामुळे आणि दुभंगत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेमुळे वार्धक्य ही कटकटीची बाब होऊन बसली आहे. कुणाच्या तरी आधाराशिवाय आपली दैनंदिनीही न उरकू शकणारं वार्धक्य आणि विकलांग करणाऱ्या असाध्य आजारानं ग्रस्त असलेले रुग्णाईत हे दोन मोठे प्रश्न आहेत. औषधोपचार आहेतच; पण त्यासोबतच उरलेलं आयुष्य चांगलं कसं घालवता येईल, हाही एक दृष्टीकोन असायला हवा. अशा असाध्य आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांमध्ये आणि वार्धक्यानं असहाय असलेल्या परावलंबी व्यक्तींमध्ये केवळ वैद्यकीय उपचार पुरेसा ठरत नाही; तर कुणाचा तरी मदतीचा हात महत्त्वाचा ठरतो, कुणीतरी समजून घेणं गरजेचं ठरतं तसेच विशिष्ट वेळापत्रकात बांधून आपली शुश्रूषा होतेय असं न वाटता, मिळणाऱ्या स्वायत्ततेचा थोडाफार उपयोग जगण्यासाठी करता येणंही गरजेचं असतं. याच भावना आणि उरलेलं आयुष्य सुखकर कसं होईल याचा विचार या पुस्तकामध्ये आहे. मृत्यूनं रुग्णावर झडप घालण्यापूर्वी त्याच्या चिमटीतून सुटणाऱ्या आयुष्याच्या अरुंद आणि अनिश्चित काळामध्ये मनाजोगं जगून घेण्याचा प्रयत्नही सफलपणे करता येतो. फक्त त्यासाठी हवी आहे थोडीशी मदत- जवळच्या व्यक्तींची आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची, जे स्पष्टपणे रुग्णाला सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन, त्या अंतिम क्षणातही त्या आजारातून त्याला पूर्णपणे बरे करण्याची हमी देतात. येथे उपचारापेक्षाही गरज असते ती उरलेलं आयुष्य सुसह्य करण्यासाठी मदत करण्याची, ते वेदनामुक्त करण्याची आणि त्या अंतिम क्षणात शक्य तेवढं मनाप्रमाणे जगत आपल्या आवडत्या माणसांच्या सोबत घरीच मृत्यूला हसत हसत स्वीकारता येण्याची; यासाठी सर्वांचंच सहकार्य गरजेचं असतं. नेमकं हेच सारं या पुस्तकामध्ये रेखाटलं आहे. गेल्या काही दशकांमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये उपशमन शुश्रूषेचा प्रांत नव्यानं आलाय, तो मृत्यूच्या मार्गावर असणाऱ्या रुग्णांच्या शुश्रूषेमध्ये या पद्धतीचा विचार आणण्यासाठीच आला आहे आणि ही पद्धत वाढत आहे, हीच पद्धत गंभीर आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही वापरली जात आहे, मग तो मृत्युमार्गावर असो किंवा नसो. मत्र्यतेविषयी आधुनिक अनुभवाचं हे पुस्तक आहे - जीव जो वार्धक्याला पोहोचतो आणि मरतो, ही गोष्ट कशी वाटते, औषधोपचारांनी अनुभव कसा बदलला आहे आणि जिथं आपल्या परिमिततेशी सामना करण्याच्या कल्पनांना चुकीचं वास्तव कसं पाहायला मिळतं... तिथं नेमका अनुभव कसा बदलत नाही – याविषयीचं हे पुस्तक आहे. वैद्यकीय सेवेमध्ये आरोग्य आणि जीवन यांना आश्वस्त करणं याला विशेष महत्त्व आहे; पण वास्तवात ते त्यापेक्षाही जास्त आहे. खरं तर त्यामध्ये चांगलं जगणं शक्य करणं अपेक्षित आहे. "
- नियमित किंमत
- Rs. 295.00
- नियमित किंमत
-
- विक्री किंमत
- Rs. 295.00
- युनिट किंमत
- / प्रति
-0%
शेअर करा
हे उत्पादन उपलब्ध झाल्यावर ईमेलद्वारे सूचित केले जाईल
Being Mortal By Dr.Atul Gawande