मानवी कथेत सशक्त कथाबीजाच्या जोरावर कथेचे आकाश पेलून मानवी मनाच्या हळव्या कोपर्यांना स्पर्श करत वाचकांना खिळवून ठेवणार्या कथाकारांची परंपरा मोठी आहे. या परंपरेला स्पर्श करणार्या कथा बायडा आणि इतर कथा या कथासंग्रहात आहेत. मानवी जीवनातील नात्यांची नाळ मानवी मूल्यांवरती पेलून धरण्याचे काम या कथासंग्रहातील पात्रं अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने करताना दिसताना. आधुनिकीकरणाच्या नावाखाली भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा बोजवारा उडालेला असताना आजही ग्रामीण जीवनात दिसणार्या भारतीय परंपरेचे लेखकांनी संवेदनशीलतेने चित्रण केले आहे.