कवी .बा.भ.बोरकर यांच्या कवितेची पृथगात्मता' या पुस्तकात त्यांच्या काव्यातील प्रतिमासृष्टीबरोबर त्यांची काव्यदृष्टी आणि प्रतिमाबळही अभ्यासली आहेत.
बोरकरांची जडणघडण, प्रेरणा, स्वत्वसाक्षात्कार यातून प्रादेशिकता, शैली, परंपरा या दृष्टीने येथे विचार झाला आहे.
डॉ. आशा सावदेकर यांनी बोरकरांच्या लौकिक चरित्रात अडकून न पडता वाङ्मयीन संदर्भांचा आधार घेऊन त्यांच्या चरित्राचे आलेखन केले आहे.
निसर्गप्रतितिधर्म बा.भ.बोरकर शैलीच्या नव्या आवरणातून आत्मत्व बिंबविण्याच्या प्रयत्नातच मराठी कवितेच्या प्रवाहात पृथगात्म ठरू शकले आहेत.
असे अनेक निष्कर्ष डॉ. आशा सावदेकर यांना सापडले, ते या पुस्तकरूपाने सर्वांसाठी उपलब्ध होत आहेत.