एका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात साध्यासुध्या कुटुंबात जन्मलेल्या आणि ऑटोमोबाइलच्या व्यवसायातून स्वत:ला घडवत, घडवत ‘ग्लोबल’ झालेल्या राम कर्णिक या ‘अस्सल कोल्हापूरकरा’ची ही आत्मकथा. केवळ ‘हिरो मिथ’च्या अंगाने जाणारी ही राम कर्णिक यांची यशोगाथा नाही. तशी ती आहेच परंतु त्याचबरोबर ही आत्मकथा म्हणजे एका संवेदनाशील, कष्टाळू, मनमोकळ्या, श्रद्धावान आणि विश्लेषक वृत्तीच्या, निसर्गप्रेमी,माणूसवेडा, कुटुंबबवत्सल व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. गोष्टीवेल्हाळपणा हा तिचा विलोभनीय विशेष.