१० मे १८५७. हिन्दुस्थानच्या इतिहासात अढळपद प्राप्त झालेला दिवस. पहिल्या स्वातंत्र्ययुध्दाचा प्रखर पुकारा या दिवसाने केला. दिल्लीजवळच्या मीरत इथे या दिवशी असंतोषाची आग भडकली आणि लोकसंतापाच्या या वणव्याने अल्पावधीत गंगा - यमुनेकाठचा सारा परिसर वेढून टाकला. मंगल पांडे याला वधस्तंभावर चढविण्यात आल्यापासून या असंतोषाचे बीजारोपण घडून आले होते आणि या यज्ञात अखेरची आहुती पडली ती तात्या टोपे याची. हा उठाव अयशस्वी झाला, पण तो वाया गेला नाही. हिन्दुस्थानच्या पहिल्या स्वातंत्र्यसमराची प्रतिष्ठा त्याला लाभली. सिध्दहस्त लेखक वि. स. वाळिंबे यांनी कुमारांसाठी प्रावाही शॆलीत सांगितलेली ही देदिप्यमान कहाणी - ’अठराशे सत्तावनची संग्रामगाथा’