मी नाही थांबणार... लढत राहीन...
नव्या शतकातही...
मी चालत राहीन...
गर्भाशय भाड्यानं देणार्या महिलेप्रमाणं
मी माझं शरीर नाही भाड्यानं देणार...
मी स्वत:शी लढतोय...
भोवतालच्या परिस्थितीशी लढतोय...
मानवजातीच्या अस्तित्वासाठी लढतोय...
माणूस लढला नाही तर तो खलास होईल...
डायनासोर होईल त्याचा...
मुठीतला आदर्श मी भाकरीसाठी फेकून देणार नाही
किंवा माझ्या दु:खाच्या ओठावर लाली लावून
चौकात त्यास उभंही करणार नाही...