उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

Asmani By Shubhada Gogate

Description

विज्ञानकथा’ हा प्रकार आता मराठीला नवीन राहिलेला नाही. अनेक वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञानकथेनं आता चांगलं बाळसं धरलं आहे. आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खांद्यावरून भविष्यातल्या शक्यतांकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणारा हा वाङ्मयप्रकार आता लोकप्रिय झालेला आहे. असं डोकावून पाहणं विस्मयजनक तर असतंच, शिवाय ते मनोरंजकही ठरतं. शुभदा गोगटे हे मराठी विज्ञान साहित्यातलं एक मान्यवर नाव. विज्ञानकथा, विज्ञानकादंबरी, विज्ञानलेख असे अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. त्यांच्या अनेक कथांना व कादंबरीला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. क्लोनिंग, कालप्रवास, यंत्रमानव अशा अनेक विज्ञान विषयांवरच्या त्यांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत.गवत खाऊन काम करणाNया यंत्रमानवाची गंमत ‘बकाबक’मध्ये आहे, वंशशास्त्राच्या घोडदौडीत निर्माण होऊ शकणारी शक्यता ‘मार्जिनल्स’मध्ये दिसते तर कालप्रवासाचा उपयोग करणारे चोर-पोलीस ‘कालचतुराची चित्तरकथा’मध्ये भेटतात. भविष्यातल्या शक्यतांमध्ये संभाव्य मानवी भावभावनांचं चित्रण करणाऱ्या या कथा आहेत. . Asmani, which literally means `from the sky` ,is a collection of thirteen Science Fiction stories by renowned writer Shubhada Gogate. The stories cover various subjects like space travel, genetic engineering, aliens,robotics, time travel etc. They tell us of possible situations which can arise out of the galloping advancement of various branches of science, human response and emotional involvement in these situations, and possible solutions to them.
नियमित किंमत
Rs. 240.00
नियमित किंमत
विक्री किंमत
Rs. 240.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Asmani By Shubhada Gogate
Asmani By Shubhada Gogate

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल