जगातील असामान्य प्रज्ञावंत शोधव्रती…ज्यांनी मानवी कल्याणाच्या ध्यासातून संशोधनाचेकष्टमय कार्य केले. त्यासाठी अवितर झटल्या.या महिला संशोधकांनी आपल्या कार्याद्वारेजगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवला;पण हे करताना त्यांना प्रत्यक्ष काय संघर्ष करावा लागला..?त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात यामुळे कोणती वादळे उठली..?याची उत्तरे या पुस्तकात सापडतात.एकीकडे ज्ञानप्राप्तीचं चिंतन आणि दुसरीकडेकुटुंब-आप्त यांची चिंता! संशोधन कार्यातील वेग आणिवैयक्तिक पातळीवरील भावनांचा आवेग.दोन्हीत स्पष्ट रेघ मारत यांनी संशोधनाला दिलेले प्राधान्य,आपली मानव कल्याणाची धडपड, खडतर वाटचालीदरम्यानदोलायमान मनोपटलावरही ठाम राहून त्यांनी सिद्धीस नेलेले कार्य!हे सारं वाचताना अचंबित होतो आपण आणि त्याचबरोबरवाटतो काहीसा खेदही… ‘स्त्री’ म्हणून संशोधन क्षेत्रातकाम करताना ‘तिच्या’ वरील मर्यादा, तिच्यावरील बंधनं;पण या साNयावर मात करून सरतेशेवटी तिचं घवघवीत यश दिपवतं!विविध क्षेत्रातील क्लिष्ट विषयातील संशोधनातसिद्ध होताना ज्या प्रज्ञावंत स्त्रियांनी अवघे आयुष्य वेचलेत्यांचे हे चरित्रबंध! सुप्रसिद्ध विज्ञानलेखक निरंजन घाटे यांच्याखास शैलीतील ही मांडणी वाचकांना काहीतरी अर्थगर्भ आणिसकस वाचल्याची अनुभूती देते.