पेट्राच्या त्या गगनचुंबी लालभडक कडा-सुळक्यांच्यामध्ये मिसेस बॉइन्टोचं प्रेत बसलेलं होतं. एखादा भयंकर मोठा, सुजलेला पुतळा दिसावा तसं ते दिसत होतं. तिच्या मनगटावरचं बारीक रक्ताळलेलं छिद्रच काय ते तिला संपवणार्या इंजेक्शनचा पुरावा होता.
मृत्यूचं हे गूढ उकलण्यासाठी हर्क्युल पायरोपाशी फक्त चोवीस तास उरले होते. जेरुसलेममध्ये उडतउडत ऐकलेलं वाक्य त्याला आठवलं, ‘बघाच तुम्ही, ती मारली जाणार आहे’. खरोखर, आजवर मिसेस बॉइन्टोइतकी मनात तिडीक उत्पन्न करणारी स्त्री त्याला भेटलेलीच नव्हती.
डेथ ऑन द नाईल या कादंबरीपेक्षा दुप्पट चमकदार कादंबरी... जी, मुळातच अतिशय प्रभावी कादंबरी होती.