‘अपार्थिवाचे चांदणे’ या ग्रंथात दभिंनी आपले वाङ्मयीन आप्त, साहित्यशास्त्रीय गुरू आणि संशोधक-शिष्य यांचा आपल्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वावर; त्यांच्या जडणघडणीवर झालेला संस्कार अलवारपणे शोधला आहे. एका ज्ञानमग्न जीवनाचा हा ललित आलेखच आहे. जीवननिष्ठा आणि सौंदर्यनिष्ठा विदग्धता आणि प्रासादिकता यांचे चांदणे इथे अपार्थिव झाले आहे.