खगोलशास्त्र हा एक सतत बदल घडत असणारा विषय आहे.
कारण नव्या नव्या शोधामुळे यात कायम भर पडत असते.
कालची नवी वाटणारी माहिती आज जुनी झालेली असते, तर
नव्या माहितीमुळे वेगळेच प्रश्न आणि कोडी निर्माण होत असतात.
सूर्यमालेबाबत कालपर्यंतच्या पाठ्यपुस्तकात गुरूला 20-21 चंद्र होते.
त्यांची संख्या आता एकोणसत्तर झाली आहे. प्लूटोला तर
ग्रहांच्या गटातून काढून टाकण्यात आले आहे.
आपल्या चंद्रावर पाणी मिळालेय, तर खुजे ग्रह अशी काहींची
नवीन गटात विभागणी झाली आहे.
एक ना दोन अनेक बाबी. नव्या मोहिमा, याने यांनी पाठवलेली नवी चित्रे.
ही सारी माहिती साध्या सोप्या भाषेत, थोडक्यात पण नेमकी,
अद्ययावत आणि संपूर्ण रंगीत चित्रांसोबत आहे. शालेय विद्यार्थ्यांना
पूरक वाचन म्हणून, ग्रहमालिकांच्या प्रकल्पांना उपयोगी आणि
सर्वसामान्यांची जिज्ञासा पूर्ण करणारी ही पाच पुस्तिकांची मालिका आहे.
आपल्या ग्रहमालिकेसंबंधीच्या या सर्वच पुस्तिका
सर्वांना कायम संग्रही ठेवण्यासाठी उपयुक्त ठराव्या...