मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणतो, पण ही फुलं फुलत असताना आपली भूमिका आपलेपणाने बागेची देखभाल करणार्याा माळ्याची आहे की रखवालदाराची हे तपासून पाहणे गरजेचे आहे. आपली मुलं फक्त आपलीच नसतात, तर ती राष्ट्राची संपत्ती असतात. त्यांच्याच विश्वासावर देश आर्थिक, सांपत्तिक, सांस्कृतिक, वैचारिक प्रगतीचे स्वप्न पाहत असतो.