कविता अविनाशी
अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी
लागले न हाताला काही अविनाशी
असे विषण्ण उद्गार काढणार्या या कवीने रसिकांच्या तबकात मात्र काव्याची अविनाशी ओवाळणी टाकली आहे! वनफूल, अंतर्देही, जगाचे श्वास आणि मॉर्निंग एम्बर्स हे म. म. देशपांडे यांचे चार कवितासंग्रह. आता ‘अंतरिक्ष फिरलो, पण...’ या पाचव्या संग्रहात त्यांच्या वेचक मराठी, इंग्रजी,हिंदी, गुजराती आणि असंगृहीत कविता अंतर्भूत झाल्या आहेत. दोन विवेचक प्रस्तावना, एक अनौपचारिक मुलाखत आणि विस्तृत संदर्भसूची या पुरवणी मजकुरामुळे ‘अंतरिक्ष’ला एक पूर्णता लाभली आहे. असा ग्रंथ रसिकांचे आस्वादस्थान आणि अभ्यासकांचे आश्रयस्थान झाल्यास आश्चर्य कसले !