आनंद बंधनात आहे की बंधनातील होण्यात आहे? बंधनाच्या सीमारेखा ओलांडून सर्वांच्या आनंदात आनंद शोधणाऱ्या समर्थांच्या लीला अनन्वयात्मक असतात असे तीव्रतेने जाणवते.
या जाणिवांचा शोध आणि बोध ज्ञान-विज्ञानास भुरळ पाडणारा आहे. भूल आणि भुरळ यातील अंतर लक्षात येताच लीलांचा अन्वयार्थ स्पष्ट होत जातो.
मग चमत्कृती किंवा अनोखे असे त्यात काहीच शिल्लक उरत नाही.
उलट त्यात जीवनाच्या स्वाभाविकतेचा प्रत्यय येत राहतो. प्रत्ययाची प्रत्यंचा ज्याची त्याची.
त्यातही संवेदनशील सव्यसाचित्व असेल तर समीक्षेच्या वेगळ्या कुबड्यांची मग गरज सहसा भासत नाही. मनच अन्वय, अनन्वय, निरन्वय बनत जाते.