अमृता-इमरोझ ह्यांची प्रेमकथा ही एक मोठी आख्यायिकाच बनून गेली आहे.
अमृता एक थोर साहित्यकार, ज्ञानपीठासह विविध पुरस्कारांनी सन्मानित अशी प्रतिष्ठित कवयित्री. केवळ पंजाबीच नव्हे, तर सर्वच भारतीय भाषांमध्ये तिची नाममुद्रा ठळक अशी आहे.
इमरोझ एक प्रतिभावान चित्रकार. ते अमृता यांना चाळिशीच्या उंबरठ्यावर भेटले. अमृताजींच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते दोघे एकत्र राहिले.
अमृता-इमरोझ यांच्या ह्या नात्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य उमा त्रिलोक यांना प्राप्त झाले.
अमृताजींच्या साहित्यप्रवासाबद्दल लिहितानाच त्या दोघांनी हे नाते सर्वांर्थांने कसे जपले याचाही मागोवा त्या समर्थपणे घेतात.
ही निव्वळ प्रेमकथाच नाही; तर प्रतिभा आणि प्रतिमेचा, मैत्री आणि प्रेमाचा एकत्र आविष्कार येथे साकार झाला आहे.