शिव आणि वीर त्यांच्या आईबरोबर म्हणजे त्यांच्या अम्माबरोबर शिर्डी, फतेहपूर सिक्री, अमृतसर आणि तिरुपती इथे सहलीला जातात. शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेतात. त्यांच्या दिव्य चमत्कारांच्या कथाही ऐकतात. फतेहपूर सिक्रीला ते त्यांच्या अम्माबरोबर सुफी संत शेख सलीम चिश्ती यांच्या दग्र्यात जातात आणि तिथलं कोरीव काम पाहतात. शिव आणि वीर त्यांच्या अम्माबरोबर अमृतसरच्या सुवर्णमंदिरात जातात. तिथली छान छान ठिकाणं पाहतात. लंगरचा आस्वाद घेतात. ते अम्माबरोबर तिरुपतीला जातात आणि भगवान विष्णूच्या कथा ऐकतात; वेंकटेश्वराचं वैभवही डोळे भरून पाहतात. तर अशा चार ठिकाणांच्या सहली बालवाचकांना ‘अम्मा, टेक मी...’ या मालिकेतील चार पुस्तकांतून अनुभवायला मिळतील, त्याही मनमोहक चित्रांसह आणि माहितीसह.