अमेरिका आणि तिच्या निरंतर सत्ता नाट्याचं व्यामिश्र दर्शन घडविणारा अनमोल ऐवज म्हणजे हे पुस्तक. ऑलिव्हर स्टोन आपला आवाज सहजगत्या पडद्यावरून पुस्तकाच्या पानांवर उतरवतात. मार्मिक छायाचित्रे, खिळवून ठेवणारी वर्णने आणि अज्ञात कागदपत्रे यांनी युक्त असलेले हे माहितीपट मालिकेतले कथन, स्टोन आणि विख्यात इतिहासकार पीटर कुझनिक यांच्या, ‘द अनटोल्ड हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेट्स’चे एक संक्षिप्त रूप सादर करते. अमेरिकेच्या अपवादात्मकतावादाच्या प्रचलित, रूढ मतांना हे आव्हान देते आणि अमेरिका तिच्या लोकशाही मूल्यांपासून किती दूर गेली आहे हे दाखवते, तसेच आपल्याला पुन्हा मार्गावर आणण्याकरता ज्यांनी संघर्ष केला त्या प्रबळ शक्तींचे दर्शन घडवते.