"डॉ. जयसिंगराव पवार यांनी अनेक इतिहास परिषदांच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणांचा हा लेखसंग्रह.... यामध्ये........ महाराष्ट्रातील गेल्या शेसव्वाशे वर्षांतील इतिहास- संशोधन परंपरेचा शोध तर घेतला गेला आहेच, शिवाय ही परंपरा अधिक गतिमान कशी होईल, त्यासाठी इतिहासप्रेमींनी व अभ्यासकांनी काय करायला हवे, याचे दिग्दर्शन केले आहे.... इतिहासाचे स्वरूप व व्याप्ती कशी असते?.... सामाजिक इतिहासाचे महत्त्व काय?.... स्थानीय इतिहासाचे राष्ट्रीय इतिहासात स्थान काय?... ऐतिहासिक वस्तू व वास्तू यांच्या अक्षम्य उपेक्षेची कारणमीमांसा काय?.... आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आपण काय करावयास हवे?.... इतिहासाचे शिक्षक इतिहासप्रेमी यांची यां संदर्भातील नेमकी कोणती जबाबदारी आहे?.... अशा अनेक प्रश्नांची चर्चा डॉ. पवार या लेखांतून करतात.... त्यातून महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी इतिहास संशोधनाकडे आकृष्ट होतील अशी आशा आहे. ... "