डॉ. आनंद नाडकर्णीं गेली चार दशकेमानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.या क्षेत्रातील त्यांच्या भरीव कार्याबरोबरचसाहित्य-कला-नाटक -चित्रपट क्षेत्रांतीलत्यांच्या मुशाफिरीमुळेते सर्वाना 'आपले' वाटू लागले आहेत.त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या ललितलेखांचा हा संग्रह. ह्यामध्ये खेळकर आठवणी आहेत,आरस्पानी व्यक्तिचित्रे आहेत,प्रवासवर्णने आहेत, जीवनशैलीविषयकप्रश्नांवरचे चिंतन आहे आणि लेखकाच्यारेषामैत्री मधून जन्म घेतलेली रेखाचित्रेदेखील आहेत.