‘साधू’ या शब्दाचा खराखुरा अर्थ काय आहे याचं समग्र विवेचन कबीरांच्या कवनांमध्ये सापडतं. ओशोंनी त्यामध्ये अतिशय सुंदर शब्दांत भर घालून या कवनांचा विस्तारित अर्थ विशद केलेला आहे. माणसामधलं ‘साधुत्व’, त्यागाभोगाच्या कल्पना, शरीररूपी सूक्ष्म धाग्यांनी विणलेली चादर आणि त्यावर कबीरांचं साध्यासोप्या प्रतीकांद्वारे दिलेलं भाष्य– या सर्वांतून ओशोंनी मांडलेली मानवी जीवनाची कल्पना... ही कबीरांची कवनं आणि त्यावरचं ओशोंचं भाष्य! यातून स्वच्छपणे जाणवतो तो दोघांनी मानवी जीवनाचा चहूअंगांनी केलेला सार्थ विचार!