आपले रोजचे आयुष्य जगत असताना आपले मन कितीतरी प्रकारचे अनुभव, भावना, विचार,जाणतेअजाणतेपणे टिपून घेत असते. आपल्या प्रत्यक्षात भेटलेली माणसे , पुस्तकातून भेटलेली माणसे, त्यांना समजून घेणे, त्याचा अर्थ लावणे, त्यातून उठणरी भावनांची, विचारांची आवर्तने. हा अनुभव कसा असला तरी त्याने आपले आयुष्य संपन्न बनत जाते. पण रोजच्या धकधकी मध्ये त्यातील काही कायमचे लक्षात राहते, तर काही मनाच्या मागेच राहून जाते. त्याला आपलाही इलाज नसतो. पण ते अनुभव, त्या घटना, तो विचार, त्या भावना आपल्या घेणेकरीच असतात. त्यांना शब्दरुपात मांडले की, कसे मोकळे मोकळे वाटते. भोगलेल्या सुखदु:खांचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
तेच वाचकांच्याही वाट्याला यावे....