आंबी...बाप्पाजींची देखणी, आईवेगळी, लाडकी मुलगी... बाप्पाजींची बहीण नको नको म्हणत असताना बाप्पाजी तिच्या मुलाशी, श्रीरंगशी आंबीचं लग्न लावून देतात... श्रीरंग नपुंसक आहे हे कळल्यावर आंबी माहेरी निघून येते...तिचं दुसरं लग्न करायला बाप्पाजी तयार नसतात...पण काही घटना अशा घडतात की बाप्पाजी आंबीशी अबोला धरतात, तिला सासरी धाडतात...श्रीरंग आंबीला मारझोड करतो...आंबी परत माहेरी येते...परत बाप्पाजी तिचा रागराग करतात...गणूआप्पा तिला अनूमावशीकडे नेऊन सोडतात...मावशी तिचं लग्न तुकाराम ड्रायव्हरशी लावून देते...तुकाराम व्यसनी, जुगारी असतो...आंबीला मारहाण करत असतो...तालेवार घरातली आंबी बेकरीत काम करायला लागते...तिला मुलगी होते...तुकाराम जेव्हा आंबीची अब्रूच डावावर लावतो तेव्हा ती मुलीसह त्या घरातून पोबारा करते...पुढे काय होतं आंबीचं? एका स्त्रीच्या जीवनाचं हृदयस्पर्शी तरीही तेजस्वी दर्शन.