लंडन : तिशीच्या आसपासची ती मंडळी त्यांच्यातल्या एकाचा वाढदिवस साजरा करायला जमली होती. वरवर बघायला ह्यात विशेष काही नव्हतं. सगळं छान नॉर्मल वाटत होतं. पण ह्या चित्राचे अंतरंग मात्र वेगळेच होते. अखंड साधनेच्या जोरावर क्लेअरचे प्रथितयश नर्तिका म्हणून नाव कमाविण्याचे चांगले आकाराला आलेले स्वप्ऩ् रस्त्यावरील एका अपघातामुळे अचानक धुळीला मिळाले होते. त्यातून सावरण्यासाठी तिला अँथनीची साथ मिळाली खऱी; पण लग्नाला काही वर्षं होऊन गेली तरी त्यांना मूल होत नव्हतं. मातृत्वाची आस असलेल्या क्लेअरला, ह्या समस्येवरील खर्चिक उपाययोजनांना सामोरे जात असतानाच़्ा, आपल्या नोरा नावाच्या छोट्या विद्यार्थिनीचा जरा जास्तच लळा लागला होता. ही मानसिक उलघाल कमी होती म्हणून की काय़्ा अँथनीच्या नोकरीवर गदा येऊ घातली होती. ह्या पाश्र्वभूमीवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे शहरात प्रचंड तणाव होता. दिवसेंदिवस बकाल होत चाललेल्या ह्या शहरात तग धरून राहणे आणखीनच कठीण होऊ लागले होते. आपल्या अतिरेकी जखमांवर फुंकर घालणारे एक अशांत शहर व आर्थिक, सामाजिक व मानसिक तणावांनी ग्रासलेली एक विवाहिता ह्यांचे दहशतवादाच्या पाश्र्वभूमीवरील मनोवेधक चित्रण.