एखादे उमदे हरीण पाडस वनात विहरते आहे ,इतक्यात त्याच्या मागे एक शिकारी लागतो ,जिवाच्या भीतीने पाडस धावू लागते ,लपण्यासाठी झुडपांचा आधार घेत श्वास घेण्यास थांबते ,जवळ आलेल्या
शिकाऱ्याला पाहून धावण्याचा प्रयत्न करणार इतक्यात त्याच्या लक्षात येते की आपली छोटीशी शिंगे फांदीत अडकली आहेत . आता पळणे अशक्य ,मृत्यू समोर उभा आहे ,अशा व्याकूळ अवस्थेत
ते पाडस ज्या आर्त नजरेने शिकाऱ्याकडे पाहते ,ती आर्तता व गळ्यातून निघणारा तो अस्फुट व्याकूळ सूर म्हणजे गझल !!!
फिराक गोरखपुरी