उत्पादन माहितीवर जा
1 च्या 1

स्वरस्वामिनी आशा Swarswamini Asha

Description

माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ ,पोलके कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा , गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बांगड्या घालणारी स्त्री अशी होती . जी मनमोकळ्या ,लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती .जिवलगा .राहिले रे दूर घर माझे हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले आहे ,त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातली होती .त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते. फाटकी साडी केवळ लकी आहे म्हणून नेसणारी आशा ही अशी मनस्वी आहे . आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या आमचे छोटे दादा यामध्ये आली आहे . पण जिभेने ती जरा तिखट आहे . आशाला वाचनाची देखील विलक्षण आवड आहे ,थोडक्यात काय तर मंगेशकरांच्या कलासंपन्नते बरोबरच या घराचे साधे निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले आहे . स्वकष्टाने ,जिद्दीने ,धैर्याने आणि कलेच्या अखंड साधनेनें आशाने चित्रपटसृष्टीमध्ये आजचे हे मानाचे स्थान मिळविले आहे . शांता शेळके
नियमित किंमत
Rs. 1,140.00
नियमित किंमत
Rs. 1,200.00
विक्री किंमत
Rs. 1,140.00
-5%
स्वरस्वामिनी आशा Swarswamini Asha
स्वरस्वामिनी आशा Swarswamini Asha

Rs. 1,140.00

अलीकडे पाहिलेले उत्पादन

तुम्हालाही आवडेल