Skip to product information
1 of 1

Dusare Mahayuddh by V S Walimbe

Description

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक राजकारणाची जडणघडण जाणून घेण्याच्या दृष्टीने दुसर्‍या महायुध्दाच्या इतिहासाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कारण हिटलरच्या आक्रमक हुकुमशाहीविरूध्द झुंज घेण्यासाठी लढल्या गेलेल्या या संघर्षाच्या अखेरीस, या विशाल समराचे दायित्व अंगावर घेणार्‍या राष्ट्रांची पुरी दमछाक झाली आणि त्यामुळे रणांगणावर विजयश्री मिळ्वूनही, राजनॆतिक आघाडीवर त्यांच्या पदरी अपयश आले. त्याचप्रमाणे दुसर्‍या एका साम्राज्यवादाला बळ प्राप्त करून द्यायलाही हा संघर्ष कारणीभूत ठरला. दुसर्‍या महायुध्दाच्या कालखंडात युरोपीय आणि जागतिक राजनीतीने अनेक वळणे घेतली; इतकी की महायुध्दोत्तर जगाचे रुपच पालटून गेले. त्यामुळे केवळ, अनेक राष्ट्रांना आपली धग पोचविणारा संघर्ष एवढेच दुसर्‍या महायुध्दाचे स्वरुप मर्यादित नसून, आंतरराष्ट्रीय राजकारणातील नवे तणाव आणि पेच यांच्यामधील प्रेरणा समजावून घेण्याच्या दृष्टीनेही दुसर्‍या महायुध्दाच्या कालखंडाचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
-10%
Condition: New
Publication: Abhijeet Prakashan
Language: Marathi
Dusare Mahayuddh by V S Walimbe
Dusare Mahayuddh by V S Walimbe

Recently viewed product

You may also like