Skip to product information
1 of 2

Dev Tari Tyala Kon Mari (देव तरी त्याला कोण मारी) By Shila Kulkarni

Description

शीला कुलकर्णी या निवृत्त शिक्षिका असून मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी लेखन केले आहे. नाट्यलेखन हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ठ्य आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लेखन केले असून सकाळ नाट्यलेखन स्पर्धेत त्यांच्या जागृति, बसेरा, इन्सानियत इ. एकांकिका पारितोषिक प्राप्त ठरल्या आहेत. पुणे आकाशवाणीवरुन त्यांच्या हिंदी एकंकिका प्रसारित झाल्या असून 'गृहिणी', 'आपले माजघर' व शालेय कार्यक्रम यातून आजपर्यंत विविध कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. त्यांनी पथनाट्य लेखन व त्याचे सादरीकरणही केले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 'पाऊलवाट' संस्कार मूल्यांच्या शिक्षणाची या त्यांच्या शैक्षणिक कृती प्रकल्पास १९८५ मध्ये N. C. E. R. T.चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अलीकडेच २०१६ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या 'मराठी संवर्धन समिती'तर्फे मला आज्जी हवी या पुस्तकास बालसाहित्याचा पुरस्कार मिळाला आहे. 'देव तारी त्याला कोण मारी' हा त्यांचा कथासंग्रह बालपणीच्या रम्य आठवणींवर आधारित आहे. विश्वास आहे की बालमित्र तसेच त्यांचे पालकही या कथासंग्रहाचे स्वागत करतील.
Regular price
Rs. 75.00
Regular price
Sale price
Rs. 75.00
-0%
Dev Tari Tyala Kon Mari देव तरी त्याला कोण मारी By Shila Kulkarni
Dev Tari Tyala Kon Mari (देव तरी त्याला कोण मारी) By Shila Kulkarni

Rs. 75.00

Recently viewed product

You may also like